तू म्हणतोस भास होतो मला तुझा
मी म्हणतेय तू आहेस मनात जशाचा तसा
काय फरक पडतो तुझ्या असण्यात नसण्यात
तू असलास कि मी बघणार नाही
तू नसलास कि तुला भेटत जाईन
का म्हणून हिनवतोय लहान माझ स्वप्न
स्वप्न स्वप्न असत फुकटात बघायला भेटत
उन्हात हुडहुडी आणत पावसात उब देत
एक मोडल कि दुसर मिळत
नाहीच काही मिळाल तर दुसर्या जन्माची आस लावत
स्वप्न स्वप्नातच खर होतोना दिसत पण तू काही बदललेला नाही दिसत
अस वाटत स्वप्नाने जाऊन तुला हलवावं
स्वप्नांचे किती ढग जमले अन कालेकुत्त झाले हे दाखवाव
स्वप्न भंगल कि ढग कोसळतात
पूस एकदाच पण जोरदार पडतो
स्वप्न तुटल तर नाही रे होत धाडस
फुकट स्वप्न पाहायला हिम्मत जुतावावी लागते
तू नाही म्हणालास तर काय तू कडू होशील
पण ते स्वप्न गोड वाटायला लागेल
स्वप्न ज्याच त्याच असत रे ज्याला त्याला काळात
ध्यानी मनी खेळलेलं ते स्वप्न माझ आहे
माझ स्वप्न म्हणून एकवेळ तुझ्यावर प्रेम केल आहे
नाही म्हणण्याचा मान तुला स्वप्नाने दिला आहे
स्वप्न विकून काही मिळत असेल तर ते नको आहे
तू तू नसणार पण स्वप्न अखेरच्या क्षणापर्यंत स्वप्नच असणार आहे
No comments:
Post a Comment