Tuesday, October 19, 2010

महाराष्ट्र नवनिर्माण सेना


  • महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
  • महाराष्ट्र राज्य व मराठी भाषा, महाराष्ट्रासंबंधीचे ज्ञान व महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास (भौतिक व सांस्कृतिक) या गोष्टींचा विचार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तत्त्वांचा मूळ गाभा आहे. हा विचार प्रत्यक्षात आणण्याकरता पक्ष बांधील आहे. मराठी संस्कृती विस्तार, मराठी भाषा विचार, मराठीमध्ये ज्ञानकक्षा रुंदावणे, भौतिक व सांस्कृतिक विकास करणे ह्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत आहेत.
  • महाराष्ट्राच्या विकासार्थ काम करण्यासाठी सर्व मराठी माणसांना - ज्यात सर्व जातींचे, धर्मांचे, पंथांचे आणि वर्गांचे लोक आले - एकत्र करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ध्वजाखाली त्यांना एकवटवणे ही गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवश्यक मानते.
  • जे मूल मराठी आई-वडिलांच्या पोटी जन्माला आले आहे ते तर मराठीच! पण त्याचबरोबर इतर भाषिकांमध्येही जो महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे, जो महाराष्ट्रावर प्रेम करतो आणि मराठी भाषा उत्तम बोलतो, आणि महाराष्ट्रात राहतो त्या माणसाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणूसच मानते. त्या सर्वांची समृद्धी आणि विकास महाराष्ट्र नवनिर्माण सेना महत्त्वाचा मानते.
  • महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या विकासासाठी त्याच्या आड येणार्याम सर्व समस्यांची सोडवणूक करणे, या विकासाआड येणार्याम सर्व सत्तागट, पंथ आणि समाजगट यांच्याशी सर्व पातळींवर संघर्ष करणे, यासाठी रचनात्मक व संघर्षात्मक कामांची उभारणी करणे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना रचनात्मक कामे व संघर्षात्मक कामे यात फरक मानत नाही. ही दोन्हीही मूलत: हातात हात घालून येणारी कामे यथाशक्ति करणे.
  • मराठी माणसाला न्याय देताना `मराठी भाषा अकादमी'सारख्या संस्थेची स्थापना करण्यापासून अन्‌ महाराष्ट्रद्वेष्ट्या परप्रांतीयांविरुद्ध रस्त्यावर संघर्ष करण्यापासून ते सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याचा, मराठी पाट्यांचा आग्रह धरणे, मराठी भाषेतील सर्व ज्ञानकक्षा रुंदावणे या सार्याय गोष्टी एकाच वेळी रचनात्मक कामे करून व रस्त्यावर संघर्ष करून पक्षाला साध्य करायच्या आहेत.
  • महाराष्ट्रातील रस्ते, आरोग्य, व्यापार, शेती, वीज, पाणी, शिक्षण, पर्यटन, महिला, कामगार, विद्यार्थी, आदिवासी, कायदा व सुव्यवस्था, क्रीडा, उद्योग, वित्त, गृहखाते, सहकार, रेल्वे, केंद्र-राज्य संबंध या क्षेत्रांतील सर्व प्रश्नांची तड लावणे आणि त्यात मराठी माणसाचे सर्वंकष वर्चस्व स्थापित करणे, ही पक्षाच्या कार्याची मुख्य दिशा आहे.
  • महाराष्ट्राच्या सत्ताकारणात व समाजकारणात तीव्र संघर्षाद्वारे परप्रांतीयांचे वर्चस्व संपूर्णत: नेस्तनाबूत करणे आणि `मराठी माणसासाठीच महाराष्ट्र' ह्यानुसार आग्रही असणे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विचारधारा आहे.
  • भौतिक व सांस्कृतिक समृद्धीचे शिखर गाठलेला, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र व मराठी माणूस बनवणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठीच ह्या पक्षाचा जन्म झाला आहे.

Saturday, May 8, 2010

Ruler Devlopments of Maharashtra

Favourable economic policies in the 1970s led to Maharashtra becoming India's leading industrial state in the last quarter of 20th century. Over 41% of the S&P CNX 500 conglomerates have corporate offices in Maharashtra. However, regions within Maharashtra show wide disparity in development. Mumbai, Pune and western Maharashtra are the most developed. These areas also dominate the politics and bureaucracy of the state. This has led to resentment among less developed regions like Vidarbha, Marathwada, and Konkan.

Maharashtra's gross state domestic product for 2008 is forecast to be at $150 billion at current market prices. The state's debt was estimated at 36 per cent of GDP in 2005.

In 2007 Maharashtra reported a revenue surplus of INR 810 crore.Maharashtra is the second most urbanised state with urban population of 42% of whole population.

Maharashtra's
is India's leading industrial state contributing 15% of national industrial output and over 40% of India's national revenue.64.14% of the people are employed in agriculture and allied activities. Almost 46% of the GSDP is contributed by industry. Major industries in Maharashtra include chemical and allied products, electrical and non-electrical machinery, textiles, petroleum and allied products. Other important industries include metal products, wine, jewellery, pharmaceuticals, engineering goods, machine tools, steel and iron castings and plastic wares. Food crops include mangoes, grapes, bananas, oranges, wheat, rice, jowar, bajra, and pulses. Cash crops include groundnut, cotton, sugarcane, turmeric, and tobacco. The net irrigated area totals 33,500 square kilometres.