Monday, January 16, 2012

रस्ता ओलांडताना धरलेला हात

रस्ता ओलांडताना धरलेला हात थोड चुकल्यावाणी वाटत होत,

रस्ता तर एक होत कारण खरतर हात तुझा धरायाचा होता.......

हात सोडला तुझा जाता-जाता "जाऊ नको"...

डोळे तुला बोलत होते,माझे तीन शब्द ऍकुन जा अस मनातल्या-मनात ओरडुन सांगत होते.......

मन धावते सारख तुला भेटायला जणु तुझी मला सवय झाली,

आपल्या आठवणीना जपता-जपता जणू ह्रुदयात तुझ्यासाठी "एकजागा" झाली.....Tuesday, January 10, 2012

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
एखाद्या वळणावर माझी वाट पाहणारी
माझ्यासाठी थांबलेली
माझ्या भेटीसाठी आसुसलेली
असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास
माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी
माझे एकाकीपण संपवणारी
माझ्या सुखात सहभागी होणारी
माझे दुखः आपले मानणारी
असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
मला मी आहे तसेच स्वीकारणारी
मला समजून घेणारी
सावली सारखी सतत
माझ्याबरोबर राहणारी
माझ्या साठीच जगणारी'
असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास.......
बऱ्याच वेळा भेटलोही असेनही कदाचित
नजरेतूनच मनातील भावना ओळखणारी
तरी सुद्धा द्विधा (confused) मनस्थितीत असणारी
असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
ती माझ्या हृदयातील
फक्त तिच्यासाठीच
राखीव ठेवलेली खास
जागा भरणारी
असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
कदाचित आता ह्या क्षणी
हि कविता वाचत देखील असेल
अन हि कविता वाचून
खुदकन हसून म्हणणारी
अरे वेड्या मीच मीच ती
तुझ्या स्वप्नात येणारी
आणि फक्त तुझ्याच
एका इशार्याची वाट पाहणारी
असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
असेलच ना कुठेतरी कोणीतरी माझ्याचसाठी ती एक खास.

Monday, January 9, 2012

सकाळी सकाळी " उठ ना " म्हणत


सकाळी सकाळी " उठ ना " म्हणत त्याच्या अंगावरून बोटे फिरवत शहारे आणणारी ती ..

" थांबना थोडा वेळ " म्हणत हलकेच तिलाच जवळ ओढणारा तो ...

हातातला हात कसातरी सोडवून लाजत पळून जाणारी ती .. सकाळीच तोंड गोड झाल्याने रोमांचित झालेला तो ...

" असेरे काय करतोस जा ना अंघोळीला "म्हणतबळेबळे त्याला दूर सारणारी ती .. उगीचच तिला सतावत तिथेच रेंगाळत मिठीत ठेवणारा तो ...

थोडेसे रागावून त्याला अंघोळीला पाठवणारी ती ..

जाता जाता मुद्दाम टॉवेल बाहेर विसरणारा तो ..

सगळे माहित असल्याने मागून टॉवेल घेऊन येणारी ती ..

" रोज रोज काय रे तुझे " म्हणत आत येणाऱ्या तिला शोवर खाली खेचणारा तो ...

पाण्याचे थेंब झेलत त्याच्या मिठीत अंग अंग शहारणारी ती ..

प्रणयमय धुंदीत पाण्याच्या थेंबासारखा तिच्यासोबत प्रेमात भिजलेला तो ..

" पुरे आता चल " म्हणत त्याचे ओले केस पुसत घाई करणारी ती डोके पुसून घेता घेता हलकेच कवेत तिला उचलून बाहेर आणणारा तो ...

" सगळे घेतले ना " म्हणत त्याच्या शर्टचे बटन लावणारी ती .. " एक काम बाकी आहे " म्हणत तिला जवळ घेणारा तो ...

" संध्याकाळीलवकर ये " असे विरहाच्या उदाशिणपणे बोलणारी ती .. " येतो ग " म्हणत जड पावलांनी ऑफिस ला जाणारा तो ............!!

Thursday, January 5, 2012

ना तुझ्यावाचून जगण्याची ओढ़….

ना तुझ्यावाचून जगण्याची ओढ़….
ना तुझ्यावाचून अर्थ या जीवना तुझ्यावाचून जगण्यासाठी मला कारणही कुठेच दिसेना…..

तुझी याचना करता करता न जाणे किती मी हरले ..
तुला खात्री देताना मला मीच अपुरी पडले …..

ठरवलं होतं तुझ्यासाठी जीवास जीव द्यावा
पण तुझ्यावाचून जगण्याचा होता नियतीचा दावा ….

भास् मला सतत तू आसपास असल्याचा
डोळे उगाच प्रयत्न करतात तुला शोधण्याचा…
तुला थांबवण्यासाठी केलेली हरेक प्रार्थना न व्हावी मंजूर …..
किती रे ही विवंचना…..
माझा एक एक अश्रु…
आज शब्द होवून पाझरतो माझा एक एक शब्द ….
आज तुझ्यासाठी फुलतो…
कधी तरी तुला हे…..माझे अस्वस्थ शब्द कळतील तुझ्यावरचे माझे प्रेम….
हे शब्दच तुला व्यक्त करतील…न जाणो त्यासाठी मी किती वाट पहावी???
तुझ्या जाण्यानंतरही तुझ्या येण्याची आस धरावी…

तुला माझ्या प्रत्येक क्षणात जपण्याचा प्रयत्न केलाय..
तुझ्यावाचून जगण्यासाठी आता देवाकडेच कौल लावलाय…
तुझ्या प्रेमाखातरच मी तुझ्यासाठी थाम्बेन
तुझ्या वाटेकडे डोळे लावून मी तिथेच उभी असेन …………..
मी तिथेच उभी असेन…………..!!!!!!!