Thursday, January 5, 2012

ना तुझ्यावाचून जगण्याची ओढ़….

ना तुझ्यावाचून जगण्याची ओढ़….
ना तुझ्यावाचून अर्थ या जीवना तुझ्यावाचून जगण्यासाठी मला कारणही कुठेच दिसेना…..

तुझी याचना करता करता न जाणे किती मी हरले ..
तुला खात्री देताना मला मीच अपुरी पडले …..

ठरवलं होतं तुझ्यासाठी जीवास जीव द्यावा
पण तुझ्यावाचून जगण्याचा होता नियतीचा दावा ….

भास् मला सतत तू आसपास असल्याचा
डोळे उगाच प्रयत्न करतात तुला शोधण्याचा…
तुला थांबवण्यासाठी केलेली हरेक प्रार्थना न व्हावी मंजूर …..
किती रे ही विवंचना…..
माझा एक एक अश्रु…
आज शब्द होवून पाझरतो माझा एक एक शब्द ….
आज तुझ्यासाठी फुलतो…
कधी तरी तुला हे…..माझे अस्वस्थ शब्द कळतील तुझ्यावरचे माझे प्रेम….
हे शब्दच तुला व्यक्त करतील…न जाणो त्यासाठी मी किती वाट पहावी???
तुझ्या जाण्यानंतरही तुझ्या येण्याची आस धरावी…

तुला माझ्या प्रत्येक क्षणात जपण्याचा प्रयत्न केलाय..
तुझ्यावाचून जगण्यासाठी आता देवाकडेच कौल लावलाय…
तुझ्या प्रेमाखातरच मी तुझ्यासाठी थाम्बेन
तुझ्या वाटेकडे डोळे लावून मी तिथेच उभी असेन …………..
मी तिथेच उभी असेन…………..!!!!!!!

No comments:

Post a Comment