Tuesday, September 4, 2012

हो बोलल्या नंतरची ती आमची पहिली भेट

हो बोलल्या नंतरची ती आमची पहिली भेट
आज ठरवलं बोलू एकदम थेट
संपूर्ण कपाटाची केला गोंधळ
एक शर्ट निवडायला किती हि धांदलतिच्यासमोर नको फिक्का पडायला
माझ्यासमोर तिन सर्व जग विसरायला
लाल शर्ट नको, गुलाबी हि नको बर
आता तर डोक्याची दहीच झाली खर

तेव्हा आईनेच शर्ट काढून दिला
हसून म्हणे लिंबू रंग खूप खुलतो माझ्या बाळाला
हृदयात आता धडधडू लागले
अरे देवा! आईला काय बर कळाले?

झाली तयारी तिला भेटायची
आता उमंग मनात तिच्या सोबत रहायची
पण ती दिसत होती खूपच गोंधळलेली
जराशी चिंतीत जराशी घाबरलेली

हातात हात घेऊन तिला विचारल
काय ग? तुला अचानक काय झालं?
म्हणाली आईबाबांचा विचार येतो मनात
नि तुझी हि सोबत हवी जीवनात

देवा नको रे आला कधी पेचात पाडूस
प्रश्न आई बाबा नि प्रेमाचा माझ्यासमोर मांडूस
दिला तिला दिलासा मी असा
तू मला नको समजूस असा तसा

कधीही नाही माझ्यामुळे होणार त्रास तुला
तुझ्या आईबाबांसमोर हव तर विसर मला
मी प्रेम तुझ्या आधी हि दुरूनच केल
नि नेहमीप्रमाणे करतच राहीन

सोबत कधीच नाही सोडू आपण
आईबाबांना हि करू राजी आपण
विश्वास ठेव माझ्यावर, माझ्या प्रेमावर
आयुष्यभर राहीन माझ प्रेम तुझ्यावर

तस आमच्या पहिल्या भेटीत
नाही झालं काही खास
पण पूर्वीपेक्षा आम्ही आलो
मनाने हृदयाने अजून जवळ पास

ऐकताना मिठीत माझ्या ठोके हृदयाचे
ती पाहत होती स्वप्न उद्याचे
आता विश्व इतके सुंदर भासू लागले
तेच तिच्या डोळ्यांतील मोती होऊन वाहू लागले

अश्रू तिचे सर्व सांगून गेले
डोळ्यांनी माझ्या तिला वचन दिले
कोणीही नाही मागे सरायचं
पण प्रेमासाठी आई बाबांना नाही विसरायचं.

No comments:

Post a Comment